आरोग्य धोक्यात -सातारा व परिसर

सातारा : सातारा शहर व परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले असून याकडे कोणतेही प्रशासन डोळे झाक करत आहे. स्वच्छतेसाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना होताना दिसत नाही, त्यामुळे शाहुनगर, आय.टी.आय. रोड, महानुभाव मठ, गोडोली, एम.आय.डी.सी. या व अशा अनेक ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर कायम स्वरुपी तोडगा निघत नाही. तात्पुरत्या स्वरुपाचे उपाय बऱ्याच ठिकाणी होताना दिसत आहेत. याचबरोबर रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्वच्छतेमुळे डेंग्यु चे मोठ्या प्रमाणात फैलाव सातारा तसेच जिल्ह्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तर काही जण दक्षावले देखील आहेत. तसेच नागरिकांच्याकडून सुद्धा स्वच्छते बद्दल म्हणावी तशी काळजी घेण्यात येत नाही. प्लॅस्टिक बंदी होवून सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिक वापरात येत आहे. यासाठी योग्य तो उपाय होणे गरजेचे आहे.