पोहचवाएखादी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. महिला व बालविकास विभागाकडे व शिक्षण विभागाकडे तक्रारींचा अर्ज आला त्याचा तात्काळ निपटारा करा व निपटाऱ्याची प्रत संबंधितांना द्या, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा. हा कायदा सर्वसामान्यांबरोबर शासकीय अधिकाऱ्यांसाठी आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे. ज्या अनाथ मुलांना जात, धर्म, पंथ माहिती नाही, अशांची व जे अनाथ मुले नातेवाईकांकडे राहतात याची एकत्र आकडेवारी द्या. बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे सांगून श्री.बच्चू कडू पुढे म्हणाले या योजनेंतर्गत प्रभावी लाभ देण्यासाठी ज्या विधवा महिलांची मुले या योजनेंतर्गत येतात, त्यांची माहिती अंगणवाडी सेविका, आशावकर यांना संकलित करण्यासाठी सांगावे. यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाला त्यांनी केल्या.
सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना लाभार्थ्यांची वाट पाहता त्यांच्यापर्यंत पोहचवा-राज्यमंत्री बच्चू कडू